Pimpri : टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेईकल्सने भारतीय कुस्ती महासंघासोबत भागिदारी करत कुस्ती क्रीडाप्रकारामध्ये प्रवेश केला

भारतीय कुस्ती संघाची अधिकृत टाटा योध्दा जर्सी क्रीडापटूंनी केली लॉंच

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स आपल्या समुहाच्या वारशाशी सुसंगती राखत सातत्याने खेळाला प्रोत्साहन देत आली आहे. देशातील तसेच परदेशातील क्रीडा प्रतिमेला प्रोत्साहन देत आली आहे. हीच परंपरा कायम राखत, टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल्स बिझनेस युनिटने (सीव्हीबीयू) आज भारतीय कुस्ती महासंघासोबत (डब्ल्यूएफआय) तीन वर्षाचा करार झाल्याची घोषणा  झाली.

या करारमुळे कंपनी  महासंघाची  प्रमुख  प्रायोजक झाली असून कुस्ती या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन तसेच पाठबळ देणार आहे, आणि आपल्या व्यावसायिक वाहनांच्या श्रेणींचा फायदा खेळाला मिळवुन देणार आहे. जकार्ता येथे होणा-या 2018 आशियाई क्रीडास्पर्धेपासून या भागीदारीला सुरुवात होईल आणि ती 2021 सालापर्यंत कायम राहील. यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्डकप तसेच 2020 साली होणा-या ऑलिम्पिक स्पर्धांसोबत कुस्तीच्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा समावेश आहे.
ही देशातील सर्वात मोठी क्रिकेटेतर संघटना असणार आहे. जिला टाटा मोटर्ससारख्या जगातील सहाव्या क्रमाकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने केवळ प्रायोजकत्वाच्या पलीकडे जाऊन मदत केली आहे. कंपनी क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यात तसेच तरुण व उद्योन्मुख प्रतिभावंतांना प्रोत्साहन देऊन, त्यांचा विकास साधून त्यांना आपल्या महत्वकांक्षा साध्य करण्यात संप्रेरकाची भूमिका बजावेल. या एेतिहासिक महाभागीदारीचा भाग  म्हणून, टाटा मोटर्स देशातंर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणा-या  देशातील सर्वोत्तम कामगिरी करणा-या पहिल्या 50 कुस्तीपटुंना मदत करेल.

या कराराबद्दल आनंद व्यक्त करतानाच, भारतीय कुस्ती संघासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन अधिकृत टाटा योध्दा जर्सीचे अनावरण करण्यात आले. भारतीय कुस्ती  क्षेत्रातील तारे ऑलिम्पिक पदकविजेते सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलीक, 2012 सालच्या ऑलिम्पिकसाठी देशासाठी पात्र ठरलेली पहिली स्त्री कुस्तीपटु गीता फोगाट, बजरंग पुनिया, संदीप तोमार, पूजा धांडा आणि सत्यव्रत कांडियन यांनी टाटा योध्दा अधिकृत जरसीचे अनावरण टाटा मोटर्स सीव्हीबीयुचे वरीष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी आणि डब्ल्यूएफआयचे अधिकारी यांच्या उपस्थितीत केले.

टाटा मोटर्सच्या  कमर्शियल व्हेकेईल्स बिझनेस युनिटचे अध्यक्ष गिरीश वाघ म्हणाले, आज  ऊर्जा व गतीवर आधारीत क्रीडाप्रकार हे  ब्रॅण्डसाठी भारतभरातील लोकांशी सामान्य जनता व खास वर्ग जोडून घेण्याचे प्रमुख व्यासपीठ झाले आहे. व्यावसायिक वाहने हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि भारतातील व्यावसायिक वाहनांचे आघाडीचे  उत्पादक टाटा मोटर्ससाठी खेळ हा आमच्या विविध संबंधितांपर्यंत  पोहोचवणारा पूल आहे. हे संबंधित म्हणजे वाहनचालक, वाहनांच्या ताफ्यांचे मालक,. डीलर्स, वितरक, मध्यमे आणि एकंदर सर्वसामान्य जनता, कनेक्टिंग अॅस्पिरेशन्स या आमच्या ब्रॅण्डच्या तत्वज्ञानाशी सुसंगती राखत, क्रीडाप्रकार व आपल्या क्षमता उत्साह आणि उत्कट आवडीच्या जोरावर देशाला पुढे नेणा-या खेळांडूना मदत करण्यावर आमचा विश्वास आहे.

कुस्ती आणि कबड्डी  हे येथील मातीतून आलेले क्रीडाप्रकार आहेत. यामध्ये कणखरपणा, आक्रमकता आणि सहनशक्तीचे प्रतिबिंब दिसते. वेग, चापल्य आणि शक्तीची परीक्षा  घेणारे हे क्रीडाप्रकार भारत आणि परदेशांतही लोकप्रियता मिळवत आहेत. हे गुणधर्म आमच्या व्यावसायिक वाहनांचा वारसा, टिकाऊपणास दीर्घकालिनता आणि दमदार कामगिरी या गुणधर्माशी सुसंगत आहेत. आमची वाहने भारतीय आणि जागतिक बाजारपेठेतील ग्राहक स्विकारत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाशी  संबंध जोडला गेल्यामुळे आम्हांला खरोखर आनंद झाला आहे. आपल्या भारतीय संघाला जकार्ता येथे होणा-या आशियाई क्रीडास्पर्धासाठी आम्ही शुभेच्छा देतो., असे ही श्री वाघ म्हणाले.

या भागीदारीबद्दल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष  श्री. बृजभूषण शरणसिंग म्हणाले, टाटा मोटर्ससाऱखा भरोसेमंद पार्टनर आमच्या सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी 2021 सालापर्यंत मिळाला आहे. याचा आम्हांला आनंद आहे. टाटा मोटर्ससारखा प्रतिष्ठित ब्रॅण्ड एखाद्या क्रीडा संघटनेशी संपूर्ण तीन वर्षसाठी करारबध्द होण्याची भारतीय  क्रीडाक्षेत्रातील ही पहिलीच वेळ आहे. कुस्ती हा खेळ शक्ती व सहनशीलतेचा आहे आणि हेच गुण टाटा योध्दा वाहनांमध्येही दिसून येतात. हा एक आदर्श सहयोग आहे, कारण दोघेही गतीशीलता, हमी, दमदारपणाचे दर्शन घडविणारे आहेत व सर्व अडथळे पार करुन क्षमता, उत्साह आणि नमुनेदार कामगिरीच्या जोरावर सर्वोच्च पातळीवर सातत्याने यशस्वी होत आहे. आम्ही एकत्रितपणे आणखी नवीन शिखरे गाठु आणि कुस्तीला एक क्रीडाप्रकार म्हणून अधिक भक्कम स्थान देऊन तरुण कुस्तीपटुंना त्यांच्या क्रीडाविषयक महत्वकांक्षा  पूर्ण करण्यात मदत करु.

बिजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणारा कुस्तीपटु सुशील कुमारने कुस्तीपटुंना सातत्याने मिळत असलेल्या यशाचे श्रेय, अप्रितम, दीर्घकालीन सहयोगाला दिले.  डब्ल्यूएफआय आणि टाटा मोटर्स खेळाला शक्य तेवढ्या उत्तम पध्दतीने प्रोत्साहन देण्यासाठी ज्याप्रकारे एकत्र आले आहेत.ते सर्वांचे डोळे उघडणारे ठरावे. मी हे म्हणत आहे कारण जर तुम्ही सातत्युपूर्ण कामगिरी करुन पदके जिंकुन आणलीत तर प्रायोजक आपोआप पुढे येतात. डब्ल्यूएफआयने एक चांगले उदाहरण प्रस्थापित केले आहे. आणि माझ्या सहकारी कुस्तीपटुंना याचा फायदा मिळणार, ही बाब आनंदाची आहे, असे सुशील म्हणाला.
लंडन ऑलिम्पिकमद्ये कांस्यपदक प्राप्त करणारी साक्षी मलिकने यासारखेच मत व्यक्त केले. 2008 मध्ये झालेल्या बिजिंग ऑलिम्पिकपासून या खेळाची प्रशंसा होत आहे. यामुळे मी आनंद आहे. आम्ही सलग तीन ऑलिम्पिकमध्ये पदके प्राप्त केली आहेत. महिला कुस्तीपटुही उत्तम कामगिरी करुन त्यांची क्षमता सिध्द  करत आहेत. टाटा मोटर्ससारख्या प्रायोजकांनी कुस्तीला पाठबळ देणे ही डब्ल्यूएफआयसाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. मला याचा अतीव आनंद झाला आहे, असे ती म्हणाली.
ब्रॅण्ड टाट योध्दापुढीवल 3 वर्षे डब्ल्यूएफआयच्या सर्व स्पर्धांना उपस्थित असेल. यात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, इंडियन ओपन, कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स, राष्ट्रकुल स्पर्धा, विश्वचषक  स्पर्धा, ग्रॅण्ड पिक्स, आशियाई क्रीडास्पर्धांचा समावेश होतो. याशिवाय आशियाई क्रीडास्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये खेळांडूना मदत करण्याचे आणि स्पर्धा खेळुन परत आलेल्या संघाचा सत्कार करण्याचे परवानाप्राप्त अधिकार टाटा मोटर्सकडे असतील.

भारताच्या क्रीडाकरणासाछी टाटा मोटर्स पूर्णपणे समर्पित आहे. खेळांना चालना देणे तसेच तरुण व उद्योन्मुख प्रतिभावंत खेळांडूना प्रोत्साहन देऊन आणि विकसित करुन त्यांच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता निर्माण करणे, यात संप्रेरकाची भूमिका बजावण्याचे कंपनीचे तत्व आणि बांधिलकी आहे. कंपनी सातत्याने विविध खेळांशी-क्रिकेट (आयपीएल), कबड्डी (युपी योध्दा) आणि फुटबॉल (जमशेदपुर एफसी) सहयोग करत आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.