Sinhagad Road : सिंहगड रोड परिसरात दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगार स्थानबध्द

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी  (Sinhgad Road) एका सराईत गुन्हेगारास पुणे पोलीसांनी स्थानबध्दतेची शिक्षा केली आहे. शुभम सचिन ऊफाळे असे स्थानबध्द करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

शुभम उफाळे (वय 21,रा.हिंगणे खुर्द, साई नगर,साई मंदिराजवळ, पुणे) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द गेल्या पात वर्षांत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Hinjawadi Crime : दारु पिऊन आल्याचा जाब विचारल्याने पतीकडून पत्नीचा खून

सिंहगड रोड परिसरातील पोलीस हद्दीत (Sinhagad Road) त्याच्याविरुध्द लोखंडी कोयता, चाकू,लोखंडी रॅड यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह घातक शस्त्राने खूनाचा प्रयत्न,दुखापत,दंगा. दरोड्यांचा प्रयत्न, बेकायदी हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते.

शुभम याच्यापासून जीवितास आणि मालमत्तेचे नुकसान होईल (Sinhagad Road) अशा भीतीपोटी परिसरातील नागरिकांनी त्याच्याविरुध्द पोलीसात तक्रार केली नव्हती.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सदर प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन शुभम याच्यविरुध्द एमपीडीए कायद्यान्वये औंरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे त्याला एक वर्षांकरीता स्थानबध्दतेचे आदेश दिले.

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख, तत्कालीन सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.