Hinjawadi Crime : दारु पिऊन आल्याचा जाब विचारल्याने पतीकडून पत्नीचा खून

एमपीसी न्यूज – दारु पिऊन घरी आल्याचा जाब विचारल्याने पतीने लाथाबुक्क्याने मारहाण करुन पत्नीचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि.9 जून) रात्री साडेअकराच्या सुमारास माणगाव, हिंजवडी (Hinjawadi Crime) येथे घडली.

अवंतिका शर्मा (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती शिवम पकंज पचौरी उर्फ भारद्वाज (वय 32, रा. माणगाव, हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अवंतिका हिचे वडील रंजनकुमार लाडलीमोहन शर्मा (वय 62, रा. अलीगढ, उत्तरप्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sangavi News: गांजा बाळगल्या प्रकरणी एकला अटक

आरोपी शिवम हा गुरुवारी दारु पिऊन घरी आला होता. पत्नी अवंतिका हिने शिवम याला दारु पिऊन आल्याचा जाब विचारला. त्या कारणावरुन दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला. आरोपी शिवम याने लाथाबुक्क्याने मारहाण करुन पत्नी अवंतिका हिला जीवे ठार मारले. हिंजवडी पोलीस अधिक (Hinjawadi Crime) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.