Amol Thorat: राज्यसभेतील विजयाची घोडदौड महापालिका निवडणुकीत कायम राहणार

एमपीसी न्यूज – राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला अक्षरश: धूळ चारली. ही विजयाची घोडदौड पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात (Amol Thorat) यांनी व्यक्त केला.

राज्यसभेच्या राज्यातील 6 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. भाजपाकडून अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडीक विजयी झाले आहे. 6 व्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार संजय पवार यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र, भाजपाने तीनही जागा जिंकल्या आहेत.

अमोल थोरात म्हणाले की, भाजपाची विधानसभेत 106 मते असताना भाजपाने 6 व्या जागेसाठी उमेदवार दिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीची 9 मते भाजपाच्या उमेदवाराला मिळाली. धनंजय महाडीक यांना शिवसेना उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली, हा महाविकास आघाडीचा मोठा पराभव आहे.

Rajya Sabha Election 2022 : भाजपच्या विजयाचे श्रेय पुण्याच्या ‘या’ दोन आमदारांना!

तसेच, आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही मतदान केले. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत: हा भाजपाचा विचार आमदारांनी आपल्या कृतीतून सिद्ध करुन दाखवला. आमदार जगताप यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांना (Amol Thorat) आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

प्रभागनिहाय बैठकांचे नियोजन…

पिंपरी-चिंचवड शहरात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. बूथ सक्षमीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या विविध योजना व विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील विजयाची घोडदौड पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही पहायला मिळणार आहे, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar : माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीसांना यश, त्यांनी चमत्कार केला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.