Vishwajeet Barne : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आपला प्रभाग, सुरक्षित प्रभाग’ अभियान

युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांची माहिती

एमपीसी न्यूज – युवासेनाप्रमुख, पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड (Vishwajeet Barne) शहर युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने ‘आपला प्रभाग, सुरक्षित प्रभाग’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मोफत घरगुती गॅस पाईप दुरुस्ती व जोडणी, गॅस शेगडी सर्व्हिसींग करुन दिली जाणार आहे.

याबाबतची माहिती देताना विश्वजीत बारणे म्हणाले, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा गॅस शेगडी दुरुस्तीचा उपक्रम आहे. गॅस पाईप खराब झाल्याने अनेकदा दुर्घटना घडतात. त्यासाठी यंदा जाणीवपूर्वक हा उपक्रम हाती घेतला.

त्याअंतर्गत मोफत घरगुती गॅस पाईप दुरुस्ती व जोडणी तसेच गॅस शेगडी सर्व्हिसिंग करुन दिली जाणार आहे. घरगुती गॅस वापरताना होणाऱ्या दुर्घटना कशा टाळाव्यात, घरगुती गॅस कशा पद्धतीने वापरावा? घरगुती गॅस सिलेंडर घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

Maval loksabha: मावळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगांना होणार साहित्य पुरवठा, दिव्यांग तपासणी शिबिराला सुरुवात

घरगुती गॅस पाईप बदलण्यासाठी व गॅस सर्व्हिसिंग करण्यासाठी आमचा प्रतिनिधी आपल्या घरी येईल. सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले घर सुरक्षित करावे. अधिक माहितीसाठी संपर्क 8237685229 या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन युवा अधिकारी बारणे (Vishwajeet Barne) यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.