Sangavi News: गांजा बाळगल्या प्रकरणी एकला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरित्या गांजा बाळगणा-या एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.9) चंद्रमणी चौक सांगवी येथे रात्री पावणे आठच्या सुमारास करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलीस नाईक प्रवीण दौलत पाटील (वय 38) यांनी  सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयंक उर्फ गुडया महेंद्र गायकवाड (वय 26, रा. जुनी सांगवी) याला अटक केले आहे.

Thergaon Suicide News : माझा मृतदेह खड्ड्यात फेका, नोकरीच्या शोधात आलेल्या एकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

आरोपी मयंक याच्याजवळ 564 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. या गांजाची किंमत 14 हजार 100  रुपये आहे. विकण्याच्या उद्देशाने आरोपीने हा गांजा आणला होता. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.