MLA Laxman Jagtap : आजारी असतानाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले राज्यसभा निवडणुकीत मतदान! मतदानानंतर म्हणाले…

एमपीसी न्यूज – राज्यसभेच्या जागांसाठी आज विधानभवनात मतदान झाले. एक एक मताची जुळवणूक महाविकास आघाडी आणि भाजपकडून सुरु होती. त्यातच पक्षाचा आदेश आहे तो पाळायलाच हवा असं म्हणत भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) रुग्णवाहिकेतून थेट पीपीई कीट घालून विधानभवनात दाखल झाले आणि मतदान केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षादेश पाळला आहे. लक्ष्मण जगताप मतदानासाठी अॅम्ब्युलन्सने मुंबईत आले. आजारापणामुळे बेडवर असूनही, लक्ष्मण जगतापांनी पक्षासाठी मोठा निर्णय घेतला. प्रवासासाठी पक्षाने चक्क एअर अॅब्युलन्सची सोय केली होती. अॅम्बुलन्समध्ये खास उपचार व्यवस्थेची सोय देखील करण्यात आली. मुंबईत मतदानासाठी जायचं यावर जगताप ठाम होते. आजारापणामुळे बेडवर असतानाही पक्षासाठी जगतापांनी मोठा निर्णय घेतला आहे. जगतापांनी मतदान केलं असून आपला शब्द पाळला आहे.

MLA Anna Bansode : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा फोन बंद आणि नेत्यांची धावपळ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जगताप (MLA Laxman Jagtap) यांचे कौतुक केले. मतदानानंतर आमदार जगताप यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या मूल्यांचे आणि विचारधारांचे पालन करीत तसेच राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देत आपण दिलेली प्रत्येक जबाबदारी मी पार पाडेल. राष्ट्रकार्यासाठी सदैव कर्तव्यतत्पर राहून आपण दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन, असे ट्विट आमदार जगताप यांनी मतदानानंतर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.