Thergaon Suicide News : माझा मृतदेह खड्ड्यात फेका, नोकरीच्या शोधात आलेल्या एकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

एमपीसी न्यूज – नोकरीच्या शोधात आलेल्या एकाने केजुदेवी बंधाऱ्यात आत्महत्या (Thergaon Suicide News) केली. माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली. हा प्रकार आज (शुक्रवारी) सकाळी थेरगाव येथे उघडकीस आला.

सुरेश कुमार (रा. केरळ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनास्थळी एक चिठ्ठी मिळून आली आहे. यामध्ये ”मी शहरात नोकरीच्या शोधात आलो होतो. मात्र, मला काम मिळाले नाही. माझ्या खिशात पैसे आणि खाण्यासाठी अन्न नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही”, असे नमूद करण्यात (Thergaon Suicide News) आले आहे.

Dapodi News: शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने लोखंडी पाईपने मारहाण

दरम्यान, पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. मात्र, ही चिठ्ठी सुरेश यानेच लिहिली आहे का? तसेच, यामागे काही घातपात आहे का, याबाबतचा अधिक तपास वाकड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.