Dapodi News: शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने लोखंडी पाईपने मारहाण

एमपीसी न्यूज –  मायलेक घराजवळ गप्पा मारत असताना शेजा-याने (Dapodi News) शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.6) भाजी मंडई, दापोडी येथे रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मल्लीकार्जुन बसप्पा चलवारे ( वय 50, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वल्ली शेख (रा. दापोडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : माहेरी जाण्यासाठी नकार दिल्याने महिलेचा विनयभंग

फिर्यादी चलवारे व त्याची आई घराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी शेजारी राहणा-या आरोपी वल्ली हा चलवारे यांनी शिविगाळ करु लागला. त्यावेळी फिर्यादी चलवारे यांच्या आईने आरोपी वल्ली याला शिविगाळ का करतोस असा जाब विचारला. त्याचा राग मनात धरुन आरोपी वल्ली याने फिर्यादी चलवारे यांना लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण करुन जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस (Dapodi News) अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.