Pune Metro : नव्याची नवलाई संपली, मेट्रोकडे पुणेकरांची पाठ, मार्चपासून प्रवासी संख्या घटली

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च रोजी पुणे मेट्रोचे  (Pune Metro) उद्घाटन करण्यात आले. खरतर मेट्रोचे काम पूर्ण झालेलं नसतानाही ते उद्घाटन करण्यात आले. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर सध्या मेट्रो सुरू आहे. मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसात मोठ्या संख्येने पुणेकर मेट्रोतून प्रवास करत होते. मात्र ही नव्याची नवलाई आता संपली असून पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली आहे. मार्चपासून मोठ्या संख्येने मेट्रोची प्रवासी संख्या घटली आहे. 

MLA Laxman Jagtap : आजारी असतानाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले राज्यसभा निवडणुकीत मतदान! मतदानानंतर म्हणाले…

मेट्रो सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या मार्च महिन्यात तब्बल चार लाख पुणेकरांनी मेट्रोतून (Pune Metro) प्रवास केला होता. तीच प्रवासी संख्या आता घटली असून त्यामुळे एकंदरीत मेट्रोची मार्चमध्ये स्वागत केल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पुणे मेट्रोची प्रवासी संख्या सातत्याने घटत आहे.

 

 

 

दुसरीकडे प्रवासी संख्या घटत असतानाही मेट्रो (Pune Metro) प्रशासन मात्र अजूनही आशादायी आहे. येत्या काही दिवसात एकूण प्रवासी संख्येचा आकडा दहा लाखांपर्यंत जाईल, असा विश्वास मेट्रो प्रशासनाला आहे. शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर मेट्रोची प्रवासी संख्या नक्की वाढेल असा विश्वास पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.