Disaster Management Demonstration : भाजे लेणी येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील ७५ महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातर्फे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचे (Disaster Management Demonstration)  आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मावळ तालुक्यातील भाजे येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

 

Pune Metro : नव्याची नवलाई संपली, मेट्रोकडे पुणेकरांची पाठ, मार्चपासून प्रवासी संख्या घटली

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विभागांची समन्वय बैठक घेऊन हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. असिस्टंट  कमांडन्ट सारंग कुरवे यांच्या उपस्थितीत सीबीआरएन आपत्ती अर्थात रासायनिक, जैविक, किरणोत्सर्ग आणि आण्विक विषयावर आधारीत आणि पुरातत्व विभागाच्या नियमानुसार प्रात्यक्षिके घेण्यात आली. पथक प्रमुख प्रमोद राय यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

 

प्रात्यक्षिकासाठी सहाय्यक संवर्धन अधिकारी पुरातत्व विभाग, श्वान व बॉम्बशोधक पथक, पुणे ग्रामीण पोलिस स्टेशन, अग्निशमन अधिकारी म्हाळूंगे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग नगरपरिषद लोणावळा,  १०८ रुग्णवाहिका,  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजे गावातील ग्रामस्थ, महसूल आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी, वन्यजीव सामाजिक संस्था,  शिवदुर्ग संस्था, व इतर स्वयंसेवक उपस्थित होते. अशा स्वरुपाच्या आपत्तीच्यावेळी घेण्याच्या खबरदारीबाबत चांगली माहिती मिळाल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  विठ्ठल बनोटे यांनी या प्रात्यक्षिकांचे समन्वय केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.