Mumbai : गणेशोत्सवापर्यंत मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमुक्ती

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवापर्यत मुंबईमधील महत्वाचे ठाणे व एरोली टोलनाके बंद राहणार आहे.  21 आॉगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत खाजगी वाहनांना टोल फ्री असणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबई बायपासचे काम सुरु असल्यामुळे मुंबईत येण्याजाण्यासाठी प्रवाशांना टोल आकारला जाणार नाही. ठाणेकर नागरिकांची बेसुमार जड वाहतुकीमुळे चहुबाजुंनी झालेली कोंडी आणि वाहतुकीस नित्त्य होणारा विलंब या पार्श्वभूमीवर किमान गणेशोत्सवा पर्यंत मुलुंड आणि ऐरोली या टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी टोल स्वातंत्र्य द्यावे अशी कळकळीची विनंती ठाण्याचे राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केली होती, खासदार सहस्रबुद्धे यांच्या मागणीला यश आले आहे.

सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदेशी यांच्याशी चर्चा करून गणपती उत्सव होईपर्यंत मुलुंड (आनंद नगर, पूर्व व मोडेला, पश्चिम) तसेच ऐरोली टोल नाक्यांवर सर्व हलक्या वाहनास टोल माफी जाहीर केली आहे. ठाणे मुंबई व परिसरातील वाहनधारकांना याचा लाभ मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.