Alandi : आळंदीचे उपनगराध्यक्ष सागर भोसले यांचा राजीनामा 

एमपीसी न्यूज – आळंदीचे उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली. 
आळंदी नगरपालिकेत यावेळी भोसले यांच्यासह नगरसेविका सुनीता रंधवे उपस्थितीत होते. उपाध्यक्ष पदाचा राजीनामा मिळाला आहे. पुढील उपाध्यक्ष निवडण्यासाठी शासकीय तरतुदीनुसार विशेष सभा बोलविण्यात येणार आहे.
या संदर्भात उपाध्यक्ष सागर भोसले म्हणाले, आळंदी नगरपरिषदेत भाजपाची सत्ता आहे. या पदावर इतरांना काम करता यावे त्यांना संधी मिळावी यासाठी राजीनामा दिला आहे. कार्यरत असताना नागरिकांना पाणी पुरवठ्यास प्राधान्य दिले. पाणी पुरवठ्याचे नियोजन जलवाहिन्यासह पाण्याच्या टाकीची बांधकामे, उद्घाटने करून लोकार्पण केले. भाविकांना उच्च दाबाने पाणी मिळावे. यासाठी त्रुटी दूर केल्या. आळंदीला थेट भामा आसखेड ते आळंदी बंद पाईप लाईनमधून पाणी पुरवठ्यासाठी प्रशासकीय कामकाज करून घेतले. यासाठी नव्याने प्रस्ताव सादर केला. यासाठी त्रुटीपूर्ण केल्या. आता प्रस्ताव मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीला आहे. लवकरच मान्यता मिळून थेट आळंदीला भामा आसखेडमधून शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.

नदी प्रदूषण आणि शहर स्वच्छ रहावे यासाठी १४ हजार डस्ट बिन खाजगी कारखान्याचे माध्यमातून नगरपरिषदेस उपलब्द्ध करून दिले. डस्ट बिन वाटपाचे काम प्रभाग निहाय सुरु आहे. नळजोड धारकांना तात्काळ नळजोड देऊन पाणी पुरवठा दिला. मिळाल्या कार्यकाळात केलेल्या कामाने आपण आनंदी आणि समाधानी असल्याचे भोसले यांनी सांगितले.
भोसले यांच्या राजीनाम्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांत जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. भाजपचे गटनेते पांडुरंग वहिले, नगरसेवक सचिन गिलबिले, नगरसेविका पारुबाई तापकीर, प्रमिला रहाणे यांची नावे उपाध्यक्ष पदासाठी पुढे आली आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाची मर्जी राखतात यावर उपाध्यक्ष नियुक्ती होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.