Pune : विनयभंग आणि जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपी अखेर जेरबंद 

एमपीसी न्यूज – विनयभंग आणि जबरी चोरी यांसारख्या गंभीऱ गुन्हे दाखल असलेला गेल्या तीन  महिन्यांपासून फरार सराईत गुंडाला सापळा रचून पोलिसांनी सोमवारी (दि. 27) रात्री दहाच्या सुमारास जेरबंद केले आहे.

अरबाज ऊर्फ बबन इकबाल शेख (वय 20, रा. भवानी पेठ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आशिश चव्हाण व प्रमोद नेवसे यांना पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता तडीपार केलेला आरोपी अरबाज ऊर्फ बबन इकबाल शेख हा चुडामण तालीम चौकात येणार असल्याची माहिती खब-याकडून मिळाली होती. त्यानुसार पथकातील कर्मचा-यांनी
सापळा रचून आरोपीला घेरा घालून जागीच पकडून जेरबंद केले.

आरोपीवर लोकांना धमक्या देणे, खंडणी मागणे, घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, विनयभंग आणि जबरी चोरी यांसारखे गंभीऱ गुन्हे दाखल असून पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.