Legislative Council : सरपंच, नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानपरिषदेतही मंजूर

एमपीसी न्यूज – नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट जनतेतून निवडीचे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मंगळवारी त्याला विधानपरीषदेतही मंजूरी मिळाली आहे. या विधेयकावरून सोमवारी सभागृहात मोठा गोंधळ झाला होता.मात्र आता या विधेयकाला दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे.

राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी थेट जनतेतून संरपंच निवडीची मागणी केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे एकतो,त्यावरुन हा निर्णय घेतला असून आम्ही निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करुन घेतले होते.

जे काही झाल ते का झाले हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही. जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा अनुभवामुळेच बदलला जातो. अजित दादाही म्हणाले होते की, जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी, असे मुख्यमंत्री सोमवारी म्हणाले होते. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विधेयकाला मंजूरी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.