Nigdi : रिक्षाचा पाठलाग करून चालकास मारहाण आणि महिलेचा केला विनयभंग

एमपीसी न्यूज : एका व्यक्तीने रिक्षाचा पाठलाग करून रिक्षा चालकास व महिला प्रवाशास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना निगडी (Nigdi) येथे सोमवारी 22 ऑगस्ट रोजी थरमॅक्स चौक, सीएनजी पंपाजवळ घडली.

Alandi News : गणेश मंडळांनी सामाजिक,समाजोपयोगी उपक्रम राबवावेत – पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर

याबाबत पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल पलंगे (वय 34 वर्षे, रा. आकुर्डी) या आरोपीच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 354, 354(ड), 323, 504, 506, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रिक्षाने प्रवास करत असताना आरोपीनी त्यांच्या रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षा जवळ येऊन या बाईचा रेट काय? असे शब्दोच्चार करून फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न केली. आरोपीने रिक्षा ड्रायव्हरला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी मध्ये गेली असता आरोपीने मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हात उगारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.