Sandeep Waghere : महापालिका नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे; संदीप वाघेरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. या नोकर भरती प्रकियेमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे (Sandeep Waghere) यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, विरोधी पक्षनेते अजित पवार व महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले, कि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा यापूर्वीच ‘ब’ वर्गामध्ये समावेश झालेला असून महापालिका सेवा नियम 2016 अन्वये महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी आरक्षित केलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी तसेच रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या ज्या भूमिपुत्रांचे 500 चौरस मीटरपासून पुढील क्षेत्र संरक्षण क्षेत्राकरिता किंवा राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या आहेत. अशा सर्व पिंपरी-चिंचवड बाधितांचे वारसदारांना नव्या आकृतीबंधाद्वारे नोकरीमध्ये सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करताना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आलेले राखीव आरक्षणा व्यतिरिक्त जादा 20 टक्के अतिरिक्त आरक्षण राहील असा नियम आहे. असे असताना देखील आता होत असलेल्या नोकर भरतीमध्ये सदर नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.

 

याबाबत मी आयुक्तांना वारंवार पत्र व्यवहार देखील केला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या दिल्या पाहिजे असा आदेश राज्य शासनाने प्रथम 1968 मध्ये जारी केला होता. त्यानंतर सुधारणा करत राज्य शासनाने 25 ऑगस्ट 1970, 13 फेब्रुवारी 1973,  2 जून 2005, 30 मार्च 2007 आणि 17 नोव्हेंबर 2019 रोजी करण्यात आला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. हा स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेला मोठ्या प्रमाणावर अन्याय आहे, असे मला वाटते. याकरिता स्थानिकांना नोकरीत 80 टक्के प्राधान्याचा जीआरचे त्वरित कायद्यात रुपांतर करण्यात येणे गरजेचे आहे.

स्थानिकांना उद्योगांमध्ये प्राधान्य देण्याची (Sandeep Waghere) तरतूद आहे. परंतु, शासकीय अथवा निमशासकीय नोकऱ्यांमध्ये तरतूद का नाही असा प्रश्न नागरिकामध्ये निर्माण होत आहे. राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक लघु उद्योग बंद पडलेले असून त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे शहरातील बेरोजगारांचा आलेख उंचावला आहे. त्यांना रोजगार मिळत नाही, तोपर्यंत रोजगाराचे हे प्रश्न सुटणार नाहीत. अनेक स्थानिक भूमिपुत्रांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या नोकर भरतीमुळे नामी संधी चालून आलेली आहे. सहकार्य केल्यास या संधीचे सोने होणार आहे.

PCMC : ओपन जिमच्या साहित्यासाठी 66 लाखांचा खर्च

आज शहरातील भूमिपुत्रांवर बेकारीची परिस्थिती ओढवली आहे. त्यांना 10 ते 12 हजार रुपयांमध्ये खासगी संस्थेमध्ये नोकरी स्वीकारावी लागत आहे. शहरातील स्थानिक भूमिपुत्र, नागरिक यांना प्रथम प्राधान्य देऊन आपण योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.