Pimpri News : शहरातील ‘या’ तीन केंद्रांवर दिवसभर होणार कोरोना चाचणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) , पिंपरी कॅम्पातील जिजामाता रुग्णालय आणि संभाजीनगर , चिंचवडमधील बीएसएनएलचे आरटीटीसी सेंटर या तीन केंद्रावर दिवसभर कोरोनाची रॅपिड अँटिजेन चाचणी केली जाणार आहे.

वायसीएम आणि जुने जिजामाता रुग्णालयात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत  अँटीजन चाचणी करता येणार आहे. तर, आरटीटीसी सेंटरमध्ये  सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत चाचणी केली जाणार आहे. पूर्वी केंद्राची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक अशी होती. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे.

दुपारनंतर चाचणी केली जात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. नागरिकांच्या सोयीसाठी वेळ वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी या वेळेत चाचणी केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे. दरम्यान, पूर्वीपासून सुरु असलेली केंद्रे आहे. त्या वेळेत सुरु राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.