Pune : शेततळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पाणी आणण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (24 जून) शिरुर तालुक्यातील धामारी येथे घडली.

तेजल सुनिल वाघमारे (वय-19) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजलने यावर्षीच पाबळ येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. काही वर्षापूर्वी तिच्या वडीलांचे निधन झाले असून ती आई व लहान भावासह धामारी गावात राहत होती. रविवारी सकाळी ती पाणी आणण्यासाठी जवळच असलेल्या शेततळ्यात गेली होती. बराच वेळ झाल्यानंतरही परत न आल्याने तिच्या आईने शोधाशोध केली असता शेततळ्यावर तिच्या चपला आढळल्या. त्यानंतर शोध घेऊन तेजलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शिक्रापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.