Kharadi : खराडी भागातील एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय मागे

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या नाराजी नंतर पुणे महापालिकेने एक दिवसाड पाणी पुरवठ्याचा निर्णय मागे घेत आता खराडी (Kharadi) येथेही केवळ गुरुवारी पाणी बंद राहील असे जाहीर कऱण्यात आले आहे. उद्या शुक्रवार (दि.23) पासून हा निर्णय अमलात आणला जाणार आहे.

Pimpri : भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगदिन साजरा

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाणी बचतीसाठी दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करताना खराडी, चंदननगर, मथुरानगर, संघर्ष चौक, वृंदावन सोसायटी, चौधरी वस्ती, सातववस्ती, गुलमोहर, शंकरनगर, गणपती सोसायटी, बराटेवस्ती, थिटे नगर, पाटील बुवानगर सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क, साईबाबा मंदिर यासह इतर भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला.

ज्या भागातील पाणी पुरवठा व्यवस्थित होता, तेथे एक दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे पाणी पुरवठा विस्कळित झाला. याविरोधात नागरिकांनी, राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यामुळे अखेर या भागातील एक दिवसाआड पाणी पुरवठा रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘खराडी भागातील एक दिवसा आड पाणी पुरवठ्याचे नियोजन हे प्रायोगिकतत्वावर होते. पण त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने हा निर्णय मागे घेतला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.