Wakad : पाय घसरून नदीत पडलेल्या तरुणाची अग्निशमन दलाने केली सुटका

एमपीसी न्यूज – पाय घसरून नदीत पडलेल्या एका तरुणाची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाकड (Wakad)  येथे घडली. नदीत पडलेला तरुण नदीच्या मध्यभागी असलेल्या गवताला धरून उभा होता.

Alandi : आळंदीमध्ये डोळे लागण संख्येत घट – नवीन रुग्ण संख्या 174

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माझा मित्र पाय घसरून नदीपात्रात पडला आहे. तो दिसेनासा झाला आहे. असा फोन पोलिसांना आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रहाटणी अग्निशमन दलास वर्दी दिली.

अग्निशमन दलाचे सिनियर फायरमन कैलास वाघेरे, किरण निकाळजे, प्रदीप भिलारे, ओंकार रसाळ, संकेत घोगरे, करण राजपूत घटनास्थळी दाखल झाले.

त्यावेळी एकजण नदीच्या प्रवाहात गवताला धरून उभा होता. त्याचा मित्र पाण्यात असलेल्या तरुणाच्या मदतीला जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्याला आत जाता येत नव्हते. तसेच नदीपात्रातील तरुण आणि किनाऱ्यावर असलेल्या दोघांनीही मद्यपान केले होते.

मदतीला जाण्याच्या प्रयत्न करीत असलेल्या त्या मित्राला पोलिसांच्या मदतीने बाजूला करीत अग्निशमन दलाचा एक जवान नदीपात्रात उतरला. त्याने नदीच्या मध्यभागी गवताला धरून उभा असलेल्या तरुणाला ट्युबच्या सहाय्याने बाहेर काढले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.