Pune : पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक 28 तास 40 मिनिटांनी संपली

एमपीसी न्यूज – लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या लाखो पुणेकरांच्या (Pune) उपस्थितीत ढोल ताश्यांच्या गजरात पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने पालखीमधून काल गुरुवारी सकाळी 10: 30 वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर आज दुपारी 3.10 वाजता अखेरचा महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती अलका टॉकीज चौकातून पुढे मार्गस्थ झाला.त्यानंतर प्रशासनाने विसर्जन मिरवणुक संपल्याचे घोषित करण्यात आले.तर लक्ष्मी रोड,कुमठेकर रोड आणि टिळक रोड या मार्गाने तब्बल 235 मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती.

Tathawade : पालिका आणि जागा मालकाच्या वादात रस्त्याचे काम रखडले

मागील काही वर्षांत मिरवणुकीसाठी लागलेला वेळ

2016 : 28 तास 30 मिनिट
2017 : 28 तास 05 मिनिट
2018 : 27 तास 15 मिनिट
2019 : 24 तास
2020 आणि 2021 : कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही
2022 : 31 तास
2023 : 28 तास 40 मिनिट

मानाच्या पाच गणपतीचे विसर्जनाची वेळ

मानाचा पहिला – कसबा गणपती 10:30 वाजता मिरवणूक सुरू तर 4:35 वाजता विसर्जन झाले

मानाचा दुसरा – तांबडी जोगेश्वरी गणपती 11 वाजता मिरवणूक सुरू 5:10 वाजाता विसर्जन झाले

मानाचा तिसरा – गुरुजी तालीम गणपती 12 वाजता मिरवणूक सुरू आणि 5.55 वाजता विसर्जन झाले.

मानाचा चौथा – तुळशीबाग गणपती 1 वाजता मिरवणूक सुरू तर 6.32 वाजता विसर्जन झाले

मानाचा पाचवा – केसरीवाडा गणपती 2:15 मिरवणूक सुरू तर 6:45 वा विसर्जन झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.