Pune : विमानतळावरून 52 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त

एमपीसी न्यूज – पुणे विमानतळावरून 52 लाख 99 हजार रुपये किमतीचे एक किलो 633 ग्राम वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. कस्टम विभागाने काल रविवारी (दि.16) पहाटे साडेचारच्या सुमारास ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेचार वाजता दुबईवरून स्पाईस जेटची फ्लाईट एस जी-52 पुणे विमानतळावर लँड झाली. फ्लाईटच्या वॉश बेसिनच्या पाठीमागे ही 14 बिस्किटे ट्रान्सपरंट टेपमध्ये गुंडाळून ठेवली होती. स्मगलिंगच्या उद्देशाने ही गोल्ड बिस्किटे आणली होती.

ही कारवाई पुणे कस्टम विभागचे उपायुक्त महेश पाटील यांच्या नियंत्रणात करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.