Pune : ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.15) रात्री साडेअकराच्या सुमारास चांदणी चौकातून पौड रोडने कोथरूड डेपोच्या दिशेने उतारावर कोथरूड येथे घडली.

सुरेखा प्रदीप वाणी (वय 55, रा. सिद्धीविनायक कृपा सोसायटी, कोथरूड), असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती प्रदीप वाणी यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रदीप वाणी हे आपल्या पत्नी सोबत घरी जात होते. यावेळी समोरून उलट्या दिशेने दुचाकी येत असल्याने प्रदीप यांचा तोल गेल्याने पाठीमागे बसलेल्या सुरेखा या खाली पडल्या. याचवेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आल्याने ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.

कोथरूड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.