Dehuroad : अपघात निघाला खुनाचा प्रकार, वैद्यकीय अहवालातून प्रकार आला उघडकीस 

एमपीसी न्यूज –  मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवर मामुर्डीत 23 नोव्हेंबर रोजी झालेला अपघात नसून तो खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शवविच्छेदन अहवालातून डोक्यात मारल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,  याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून आरोपी निष्पन्न झाले नाहीत.

दामोदर तुकाराम फाळके (वय 47, रा. गजानन सोसायटी साईनगर, गहुंजे, मावळ) असे खून झालेल्यांचे नाव आहे. दामोदर फाळके यांचा 23 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता मामुर्डीतील गोदरेज कंपनीजवळ मुंबई एक्सप्रेस वेच्या सर्व्हिसरोड लगत गाडीवरुन पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा वेदांत फाळके यांना अपघाती मृत्यू झाल्याची खबर दिली होती.

पोलिसांनी कागदपत्राचे अवलोकन केले. घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, अॅडव्हान्स सर्टीफिकेट, डेथ सर्टीफिकेटची तपासणी केली. शवविच्छेदन अहवाल राखून ठेवण्यात आला. वैद्यकीय अधिका-यांनी दामोदर फाळके यांचा मृत्यू अपघाती नसून घातपाताने झाल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला. तसेच फाळके यांनी मद्यप्राशन अथवा तत्सम अंमली पदार्थाचे सेवन केले नव्हते असेही स्पष्ट केले. फाळके यांच्या डोक्यात ठणक व बोथट हत्याराने मारुन खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. आरोपी अद्यापपर्यंत निष्पन्न झाले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.