Corona Vaccination : कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून, ‘येथे’ करा लसीसाठी नोंदणी

एमपीसी न्यूज – कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरू होत आहे. लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात 60 वर्षावरील सगळ्यांना, तर 45 ते 60 या वयोगटातील कोमॉर्बिड (सहव्याधी) असणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लस घेण्यासाठी कोविनच्या संकेतस्थळ किंवा कोविन ॲपवरून नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्यानंतर लसीकरणाचे केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला कळवली जाईल.

लसीकरणासाठी सरकारी व खासगी लसीकरण केंद्रवर लस उपलब्ध करण्यात आली आहे. सरकारी आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण मोफत असेल तर खासगी आरोग्य संस्थांमध्ये त्यासाठी 250 रुपये प्रति डोस प्रति शुल्क द्यावे लागणार आहे.

याठिकाणी अशाप्रकारे करा लसीसाठी नोंदणी

– नोंदणीसाठी खालील संकेतस्थळावर जा.

https://selfregistration.cowin.gov.in/

– संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.

– त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.

– त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. या अकाऊंट डिटेल्सच्या पानावरच युजर लसीकरणाची तारखी देऊ शकतात. नंतर तुम्ही लसीकरण केंद्रासाठीही संपूर्ण माहिती भरू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड अशी माहिती दिल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.

– तुम्हाला जवळ असलेल्या केंद्रावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध वेळ सांगितली जाईल. तिथे Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation चं पान उघडेल. तिथे Confirm करा. तुम्हाला नोंदणी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. ते पान तुम्हाला डाऊनलोडही करता येईल.

लसीकरणासाठी 60 वर्षावरील तसेच, 45 वर्षांपेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेले व्यक्तींसाठी आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.

तसेच, 45 ते 60 वर्ष या वयोगटातील ज्या व्यक्तींना सहव्याधी (कोमॉर्बिड ) असेल त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून सहव्याधी असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.