Pune : स्थायी समिती अध्यक्ष फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करणार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचा बजेटकडे लक्ष लागले आहे. साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रासने बजेट सादर करणार आहे, अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे.

आयुक्तांच्या बजेटवर स्थायी समिती सदस्यांनी चर्चा केली. नवीन बजेटवर काम सुरू झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष्याच्या नगरसेवकांना नेमका किती निधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. तर, शिवसृष्टी, समान पाणीपुरवठा योजना, मेट्रो, चांदनी चौक उड्डाणपूल, बालगंधर्व पुनर्विकास असे अनेक मोठमोठे प्रकल्प रेंगाळले आहेत. आणखी नवीन प्रकल्पांचा समावेश होणार का, याची उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.