Dehuroad : आर्डनन्स फॅक्टरीमधील 14 चंदनाच्या झाडांची चोरी

एमपीसी न्यूज – देहूरोड आर्डनन्स फॅक्टरीमधील 10 हजार रूपये किंमतीची 14 चंदनाची झाडे तोडून नेली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेंद्र प्रताप सिंग (वय-59,रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी 10 हजार रूपये किंमतीची 14 चंदनाची झाडे तोडून नेल्याचा प्रकार समोर आला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.