Thergoan News: भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचे डेंग्यूमुळे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे आज (मंगळवारी) निधन झाले. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. एका खासगी हॉस्पिटलमध्ये आज, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अर्चना बारणे या प्रभाग क्रमांक 23, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भुषविले आहे. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

थेरगाव येथील स्मशानभूमीत रात्री 8 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.