Thergaon : बांधकाम मजुरांचे डांगे चौकात ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज – महापालिका क्षेत्रातील डांगे चौकातील बांधकाम मजूर नाका (Thergaon)त्यांना हटवून बंद करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन व पोलिसांकडून करण्यात येत असल्याचा आरोप करत त्याविरोधात कष्टकरी मजूर, कामगारांनी एकत्र येत कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे नेतृत्वात ठिय्या आंदोलन आंदोलन केले.

प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, माध्यम प्रमुख उमेश डोर्ले, कार्याध्यक्ष रवींद्र (Thergaon) गायकवाड, योगेश लोंढे, अशोक भिसे, बाळू लोखंडे, दयानंद गायकवाड, रमेश राठोड, तारा जाधव, हिराबाई राठोड, रंजना कांबळे,वत्सला रोकडे अमोल पवार आदी उपस्थित होते.

Talewade : प्रस्तावित रस्त्यांना गती, जागा ताब्यात घेण्याकरिता शिबिर

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की डांगे चौकातील कामगार नाका हा सुमारे 40 वर्षांपूर्वीचा आहे. इथे रस्ता खूप छोटा होता तो वाढला उड्डाण पूल, बी.आर.टी. मार्ग झाला. विकासाला विरोध केला नाही मात्र राबणाऱ्या कामगारांचे त्यात स्थान काय ? सरकार रोजगार देत नाही मजूर,कामगार केवळ , 1 वाजेपर्यंत थांबत असतात. त्यानंतर ते कामावर जातात. आताच का त्रास जाणवू लागलेला आहे. कामगार नाक्याला पुरेल इतकी जागा तिथे असताना सुद्धा कामगार नाका स्थलांतर करण्याचे महापालिका व वाहतूक पोलीस विभागाकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील आणि महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातील कामगार या ठिकाणी उभे राहून कामाची प्रतीक्षा करीत असतात. कधी काम मिळतं तर कधी नाही मिळत. परंतु त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जातो. एकतर रोजगार मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही. नाक्यावरील मजूर त्यांचा रोजगार ते स्वतः शोधत आहेत मात्र त्यासाठी प्रशासनाकडून मदत न करता ते नाकेच नष्ट करण्याचा जो प्रकार आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. कामगारांना शिस्त लावण्याची गरज आहे. ती लावण्यात येईल मात्र नाका हलवण्याचा प्रयत्न झाला. तर. महापालिकेसमोर रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही नखाते यांनी दिला.

वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड व महापालिका अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी करत हा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.