Dehuroad : बांधकाम साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- बांधकाम साईडवर सुरक्षा जाळी व्यवस्थित (Dehuroad) न लावल्याने त्यातून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 22 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर लेखा फार्म जवळ किवळे देहूरोड येथे घडली. या प्रकरणी 20 ऑक्टोबर रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुल हसवंत परमार (वय 42) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad )फिर्यादी दिली आहे. त्यानुसार कॉन्ट्रॅक्टर दशरथ शिवनाथ सिंग (वय 46, रा. सुसगाव, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिंटू जगद सहानी (वय 20) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

Talewade : प्रस्तावित रस्त्यांना गती, जागा ताब्यात घेण्याकरिता शिबिर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परमार यांची लेखा फार्म जवळ बांधकाम साईट सुरू आहे. आरोपी दशरथ सिंग याने तिथे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे. त्याने कामगारांच्या सुरक्षेसाठी बांधकामाच्या बाजूने सुरक्षा जाळी व्यवस्थित लावली नाही. त्यामुळे बांधकाम साइटवर काम करत असताना कामगार मिंटू हा पडला. मात्र जाळी व्यवस्थित लावली नसल्याने त्यावर तो अडकला नाही. त्यातून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.