Mahalunge : कंपनीतील कामगारांनी चोरले 82 हजारांचे साहित्य

एमपीसी न्यूज – कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी कंपनीतून 82 हजार रुपये (Mahalunge)किमतीचे पार्ट चोरून नेले. हा प्रकार ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत भांबोली येथील डेल ऑटो इंडिया प्रा लि या कंपनीत घडला.

ओमकार प्रकाश चव्हाण (वय 35, रा. धानोरी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी (Mahalunge)एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश दत्तात्रय चोरगे (वय 28, रा. पापळवाडी, पाईट, ता. खेड), सचिन ज्ञानेश्वर आरुडे (वय 30, रा. तिन्हेवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thergaon : बांधकाम मजुरांचे डांगे चौकात ठिय्या आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आकाश आणि सचिन हे भांबोली येथील डेल ऑटो इंडिया प्रा लि या कंपनीत काम करीत होते त्यांनी कंपनीतून 82 हजार 644 रुपये किमतीचे मेकॅनिकल थ्रोटल पार्ट चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.