Thergaon News : पवना नदीतील मृत मासे सडू लागल्याने विल्हेवाट लावण्याची थेरगाव सोशल फाउंडेशनची मागणी

एमपीसी न्यूज : थेरगाव येथील केजुदेवी बांधऱ्याखाली पवना नदीतील हजारो मृत मासे सडू लागल्याने त्यांना काढुन त्यांची विल्हेवाट लावण्याची (Thergaon News) थेरगाव सोशल फाउंडेशनने मागणी केली आहे. हे मृत मासे सडू लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंगळवार 13 डिसेंबर रोजी थेरगाव सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना हजारो मृत मास्यांचा खच केजुदेवी बंधाऱ्याखाली असलेल्या पवना नदीच्या पात्रामध्ये दिसला. असे मासे मृत पडण्याचे प्रकार प्रत्येक वर्षी होत असल्याने व  यावर कोणताही ठोस उपाय करत नसल्याने फाउंडेशनच्या वतीने मृत मासे व दूषित पाणी पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांना देण्यात आले होते.

नदीपात्रात पडलेले हे मृत मासे आता कुजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune News : पुण्याच्या कबड्डी संघाचे नेतृत्व श्रीधर कदम व श्रावणी सावंत यांच्याकडे

याबाबत फाउंडेशनचे संस्थापक सदस्य राहुल सरोदे म्हणाले की, पवना नदीपात्रात मृत मासे सापडल्याच्या घटनेला आज तीन दिवस पुर्ण झासे आहेत. तरी महानगरपालिकेने या मास्यांना गोळा करून त्यांची विल्हेवाट लावली नसल्याने ते कुजू लागले आहेत. त्यामुळे परिसराच दुर्गंधी पसरली आहे. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे महानगरपालिकेने त्वरित या मास्यांना गोळा करून त्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी थेरगाव सोशल फाउंडेशनने केली आहे.

रोज सकाळी येथे मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकला येत असतात. त्यांना देखील या दुर्गंधीचा त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.(Thergaon News) संध्याकाळी मोठ्या प्रमाणात लहान मुले व त्यांचे पालक जवळच असलेल्या उद्यानात येत असतात. त्यांचाही आरोग्याला धोका होऊ शकतो.

महानगरपालिकेने लवकरात लवकर नदीतील जलपर्णी काढावी अशी आमची मागणी आहे. मनपाने काही कामगार जलपर्णी काढण्याच्या या कामासाठी लावले आहेत परंतु हे कामगार दिवसभरात फक्त 1 ते 2 तास काम करतात. अशामुळे 3- 4 महिन्यात देखील जलपर्णी पूर्णपणे काढता येऊ शकणार नाही. त्यामुळे मनपाने आणखी जास्त लोक लावून लवकरात लवकर जलपर्णी काढावी अशी मागणी फाऊंडेशनने केली आहे.

तसेच ज्यांच्यामुळे मासे मृत झाले आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी फाउंडेशनने केली आहे.

याबाबत संजय कुलकर्णी सहशहर अभियंता पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका म्हणाले की, मनपाच्या पर्यावरण विभागाने मृत माशांचे व दूषित पाण्याचे सॅम्पल्स घेऊन ते मनपाच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तसेच मृत माशांचे व दूषित पाण्याचे सॅम्पल्स महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (Thergaon News) महामंडळाकडेही टेस्ट्स करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत जलपर्णी काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.