Thergaon: शेअर मार्केटमध्ये जास्त आय.पी.ओ.  मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची 77 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  शेअर मार्केट मध्ये जास्त आय.पी.ओ. मिळवून देण्याच्या (Thergaon)बहाण्याने नागरिकाची 77 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे, ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने 7 डिसेंबर 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत थेरगाव येथे घडली आहे,
यावरून वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी सोमवारी (दि.25) फिर्याद दिली, यावरून जिमीत  (Thergaon)मोदी व धनंजय सिंहा व मिका चोपडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी फेसबुकवरून लिंकद्वारे एक व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला. यावेळी आरोपीनी ग्रुपवर शेअर मार्केट अनालिसिस टाकून फिर्यादी यांचा विश्वास सांपादन केला. फिर्यादी यांना पुढे आरोपींनी शेअरमार्केट विषयी रेकमेंडेशन  केले.

Chakan : खून करून दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आखली होती मोठी व्युहरचना

त्यानुसार फिर्यादी यांना जास्थ नफा व आय.पी.ओ. मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यावेळी फिर्यादी यांनी त्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यात 77 लाख 50 हजार रुपये पाठवले मात्र  फिर्यादी यांना कोणताही  फायदा करून ने देता त्यांची फसवणूक केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.