Dighi: खुन्नस देतात म्हणून दोघांना बेदम मारहाण 

एमपीसी न्यूज –  खुन्नस देतात म्हणून तिघांनी दोन तरुणांना(Dighi) बेदम मारहाण केली आहे, ही घटना रविवारी (दि.24) दिघीतील आदर्शनगर येथे घडली आहे.
याप्रकरणी   ओमकार नागनाथ धपाटे (वय 20 रा.दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात(Dighi) फिर्याद दिली आहे, यावरून बाळा गणेश गगणे (वय 21 रा.दिघी), कुणाल रेकडो (वय 22 रा. दिघी) व अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र निखील हे बाहेर जात असताना आरोपींनी त्यांना आवडले. यावेळी बाळा व कुणाल यांनी  तू आम्हाला खुन्न्स का देतोस, तुला माहिती नाही आम्ही कोण आहे अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी व क्रिकेट स्टंपने मारहाण केली, यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=lST7LUQdN7g&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.