Pune Crime News : भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, रिक्षा चालकासह तिघांना अटक

एमपीसी न्यूज : पुण्याच्या रेसकोर्स परिसरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या मुली जवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. त्याचाच फायदा घेऊन संबंधित रिक्षाचालकाने या मुलीला रेसकोर्स जवळील एका झाडीत नेत तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकाचा तिघांना अटक केली आहे. 

सागर बिभीषण बचुटे (वय 24), विकी कुमार फुलो पासवान (वय 23) आणि अशोक विर बहादुर थापा (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणि 5 जानेवारी 2019 रोजी हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फिर्यादी आणि त्याची मैत्रीण सागर बचुटे याच्या रिक्षाने बुधवार पेठ येथे जात होत्या. यावेळी फिर्यादी आणि त्यांचा मैत्रिणीकडे पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने रेसकोर्स समोरील झाडीमध्ये नेऊन फिर्यादी बरोबर शारीरिक संबंध ठेवले.

तर डिसेंबर 2019 च्या दुसऱ्या आठवड्यात फिर्यादी या फुरसुंगी परिसरात राहत असताना त्यांच्या ओळखीचे असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून त्यांची छेड काढली. दरम्यान तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.