Pune Crime News : माता न तू वैरिणी ! दोन चिमुरड्यांचा गळा घोटून आईनेच केला खून

एमपीसी न्यूज : पुण्याच्या पौड परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईनेच दोन चिमुकल्यांचा गळा आवळून खून केला आहे. मुळशी धरण परिसरातील शिरवली येथे ही घटना घडली. पौड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पूर्णा संजय सोळंकी असं अटक केलेल्या आईचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील शिरोली येथील एका लेबर कॅम्पमध्ये सोळंकी दांपत्य राहत होतं. ते मूळचे मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका भागवत होते. त्यांना चंदा सोळंकी (वय 3) आणि आनंद सोळंकी (वय 2) ही दोन लहान मुले होती.

पूर्णा सोळंकी ने रागाच्या भरात दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला आणि त्यांचे मृतदेह झाडीत टाकून निघून गेली. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.