Ambegaon : पोहण्यासाठी गेलेली शिंगवे गावातील तीन मुले मीना नदीत बुडाली

एमपीसी न्यूज – आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावातील पोहण्यासाठी गेलेली तीन मुले मीना नदीत बुडाली. ही घटना आज रविवारी (दि.29) घडली. 

वैभव चिंतामन वाव्हळ, प्रणय राजेंद्र वाव्हळ, श्रेयश सुधीर वाव्हळ अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

वैभव, प्रणय आणि श्रेयस तिघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आज रविवार तसेच घटस्थापनेची सुट्टी असल्याने मुले नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. मात्र, हा आनंद त्यांच्या जीवावर बेतला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.

दरम्यान, घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आंबेगावचे तहसीलदार, मंचर पोलीस, एनडीआरएफ टीमही शोध कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.