Dehuroad : फळविक्रेत्यांना हप्ता मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – आठवडे बाजारात फळविक्रीचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना तीन जणांनी जबरदस्तीने दोन हजार रुपये हप्ता मागितला. हा प्रकार सोमवारी (दि. 22) सकाळी अकराच्या सुमारास देहूगाव येथे घडला.

शमीम जुबेर शेख (वय 30, रा. ओटास्कीम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिरुद्ध काळोखे, महेश माळी आणि अन्य एकजण या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगावात संत तुकाराम महाराज मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर मंगळवार आणि शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात आसपासच्या परिसरातील शेतकरी आणि व्यापारी येतात. शेख हे फळविक्रेते आहेत. ते देखील देहूगाव आठवडे बाजारात फळविक्रीचा स्टॉल लावतात. सोमवारी (दि. 22) सकाळी अकराच्या सुमारास ते स्टॉलवर असताना अनिरुद्ध, महेश आणि अन्य एक असे तिघेजण शेख यांच्या स्टॉलवर आले. त्यांनी शेख आणि त्यांच्या सहका-यांकडे प्रत्येक स्टॉलसाठी दोन हजार रुपये देण्याची मागणी केली. शेख यांनी त्यासाठी नकार दिला असता,  शिवीगाळ करत मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.