Today’s Horoscope 04 February 2023 -जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 04 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग 

वार – शनिवार.

04.02.2023.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- पुनर्वसू 9.16 पर्यंत नंतर पुष्य.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- चंदेरी )

मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. मातोश्रींचे सल्ले महत्त्वपूर्ण असतील.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी )

आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे फायद्याचे राहील. गृहिणींना आज माहेरीची ओढ लागेल.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )

धंद्यात रखडलेली येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. मृदू वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आज आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च टाळायला हवा.

कर्क (शुभ रंग- पांढरा )

तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा.

सिंह (शुभ रंग- मरून )

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज असा एखादा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या.

कन्या ( शुभ रंग- हिरवा )

आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध रहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. विचारांती निर्णय घ्या.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी )

नोकरीच्या ठिकाणी बाढतीची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य तेच सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काम करा. कर्तव्यास प्रथम प्राधान्य द्या.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. स्वतःवर संयम ठेवा.

धनु- (शुभ रंग- गुलाबी )

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठ्या उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकला. आज आर्थिक धाडस मर्यादे बाहेर नको. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

मकर ( शुभ रंग- राखाडी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

कुंभ (शुभ रंग – पिस्ता )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील काही मतभेद सामंजस्याने मिटू शकतील.

मीन -(शुभ रंग – निळा )

आज तुमच्या प्रामाणिक मेहनतीस दैवाची उत्तम साथ राहील. स्वतःचे छंद जपण्यासाठी तुम्ही वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.