Pune News : झाडांची छाटणी करत असताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – माणिक बाग येथील एका मोठ्या गृहप्रकल्पात झाडांची छाटणी करत असताना विजेच्या तारेस स्पर्श होऊन एकाचा जागीच मृत्यू (Pune News) झाल्याची घटना घडली.अशोक मारुती सोन्नर (वय 38, रा. शिवनेरी नगर, कोंढवा पुणे ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अशोक हे सिंहगड रस्ता परिसरातील माणिक बाग येथील टाऊनशिप येथे झाडे तोडण्याचे काम करत होते. यावेळी त्यांचा  संपर्क जवळच असलेल्या विद्युत वाहिनीशी आल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Today’s Horoscope 04 February 2023 -जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

या घटनेची माहिती मिळताच आनंदनगर येथील अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उमराटकर, केंद्र अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल संतोष भिलारे, अग्निशमन जवान राकेश बरे, आदिनाथ पवार (Pune News) तात्काळ उपस्थित झाले.

पुढील अधिक तपास सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अक्षय पाटील करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.