रविवार, जानेवारी 29, 2023

Today’s Horoscope 05 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 05 December 2022 
वार – सोमवार
05.12.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- सोम प्रदोष.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र -अश्विनी, 7.15 पर्यंत नंतर भरणी.
चंद्र राशी – मेष.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )
आज तुम्ही अति आक्रमकतेने व हट्टी पणाने काही चुकीचे निर्णय घ्याल. कठोर बोलल्याने तुमचेच काही हितचिंतक दुरावतील. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )
वाढत्या कौटुंबिक गरजा भागवताना तारेवरची कसरत होईल. घरात आज वडीलधारी मंडळीही हट्टीपणाने वागतील. कोणताही कायदा मोडू नका दंड भरावाच लागेल.

मिथुन ( शुभ रंग- भगवा ) – Today’s Horoscope 05 December 2022 
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. पैशाअभावी अर्धवट राहिलेले उपक्रम सुरू करता येतील.

कर्क (शुभ रंग- क्रीम)
गोड बोल्या मित्रमंडळींना दोन हात दुरच ठेवा. आज फक्त आपल्या ध्येयास, कर्तव्यास प्राधान्य द्या. काही महत्त्वकांक्षी व ध्येयवेड्या लोकांचा सहवास लाभेल व तुमचेही विचार प्रगल्भ होतील. मनी योजाल ते तडीस न्याल.

सिंह (शुभ रंग- सोनेरी )
उद्योगधंद्याच्या दृष्टीने आज थोडा विरोधी दिवस असला तरीही तुमचे मनोबल आज उत्तम असेल. ज्येष्ठ मंडळींचा आध्यात्मिक मार्गाकडे कल राहील. घरात एखादे देवकार्य करण्याचे बेत आखाल.

कन्या ( शुभ रंग- मरून)
अंग मेहनतीची कामे करणाऱ्या मंडळींनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. आज कोणतीही धाडसाची कामे करू नका. तरुण मंडळींनी गैरवर्तना पासून लांब राहावे. प्रतिष्ठेची काळजी घ्या.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
समोरच्या व्यक्तीवर आज तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. रोजगार प्राप्तीसाठी उत्तम संधी चालून येतील. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल.

वृश्चिक (शुभ रंग- मोतीया)
नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका. हितशत्रू मित्रांच्या गराड्यात लपलेले असू शकतात सतर्क रहा. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागणार आहेत.

धनु- (शुभ रंग- पांढरा)
आज तुमचा कामापेक्षा मौजमजा करण्याकडे कल असेल. काही रसिक मंडळी तर नोकरीला दांडी मारून करमुडकीस प्राधान्य देतील. आज एकतर्फी प्रेमाला समोरून प्रतिसाद मिळेल.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )
एखाद्या जोडधंद्यातून आज सांगली कमाई होईल. गृहिणींचे गृह उद्योग सुद्धा तेजीत चालतील. आज मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस करा. गर्भवती महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी.

कुंभ (शुभ रंग – नारिंगी)
कामानिमित्त घडलेले जवळपासचे प्रवास कार्य साधक ठरतील. प्रवासात काही नवे हितसंबंध जुळतील. गृहिणींना आज घर स्वच्छतेचे मनावर घ्यावेच लागेल. मुलांचा अभ्यासात आनंदी आनंद असेल.

मीन -(शुभ रंग – निळा )
आज आर्थिक बाजू तुमची भक्कम असेल त्यामुळे मनासारखा खर्च करू शकाल. मृदू वाणीने आज विरोधकांनाही आपलेसे कराल. नव विवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Maval News: सोमाटणे फाटा चौक वाहतूक कोंडीने त्रस्त, वाहतूक पोलिसांची कमी पडतेय का गस्त?

Latest news
Related news