Today’s Horoscope 05 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार   शुक्रवार. …. ​दि​.  05 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार –18 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – विशाखा 18.28 पर्यंत नंतर अनुराधा.
  • चंद्र राशी – तूळ 12.47 पर्यंत नंतर वृश्चिक.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग जास्त होईल. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागेल. आज देण्यघेण्याच्या व्यवहारात सतर्क राहा.

वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अति महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्बेतीवरही लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन – ( शुभ रंग – चंदेरी)
नोकरीच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल मित्र दिलेली आश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)
कामाच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न डोकावता बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहिल. कार्यक्षेत्रात अनुभवी व्यक्तींचे सल्ले डावलू नका.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज घरात आर्थिक सुबत्ता येईल. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल. कार्यक्षेत्रात वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल. तुमची कार्यक्षमता वाढणार आहे.

कन्या – ( शुभ रंग – मरून)
कार्यक्षेत्रात तुमचा मानमतराब वाढेल. काही अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील. आज भावंडात सामंजस्य राहील. रिकामटेकड्या चर्चेत काही मतभेद होण्याची शक्यता.

तूळ – ( शुभ रंग – निळा)
काही रखडलेली कामे मार्गी लागतील. विवाहेच्छुकांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणावरून थोडी कुरबूर होईल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग – क्रीम)
आज अति धावपळ टाळा. हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क ला प्राधान्य देणे हिताचे राहील. कंजूष पणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. बचत वगैरे आज जमणार नाही.

धनु – (शुभ रंग- राखाडी)
हाऊस करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल मित्र-मैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल. काहीजणांना दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपल्या मौल्यवान वस्तूची आज काळजी घ्या.

मकर – ( शुभ रंग – मोरपंखी)
वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. आज मोठ्या आर्थिक उलाढाली यशस्वी होतील. आज तुम्हाला आपल्या जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.

कुंभ – ( शुभ रंग – मोतिया)
नोकरीच्या ठिकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढलेला जाणवेल. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. मित्र मंडळीना आज दोन हात दूरच ठेवा. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागेल.

मीन – ( शुभ रंग- जांभळा)
आज मनाच्या द्विधा अवस्थेत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. आज धाडसाची कामे टाळा. सासुरवाडी कडून काही लाभाची शक्यता आहे. पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे व्हा.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.