Today’s Horoscope 11 August 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – बुधवार दि. 11 ऑगस्ट 2021

  • शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
  • आज विशेष – बृहस्पती पूजन.
  • राहू काळ – दुपारी 12.00  ते 01.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – 09.32 पर्यंत पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, नंतर उत्तरा फाल्गुनी
  • चंद्र राशी – सिंह 15.23 पर्यंत नंतर कन्या.

—————————————

आजचे राशीभविष्य-

मेष – (शुभ रंग- मोतिया)

कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. भावनेच्या भरात मात्र कुणाला शब्द देऊ नका. व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागणार आहेत.

वृषभ – ( शुभ रंग -मोरपंखी)

नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामात काही अडथळे येतील. मुलं आज अभ्यासाचा कंटाळा करतील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळू शकाल.

मिथुन -( शुभ रंग- सोनेरी)

आवक समाधानकारक असल्याने तुमची मनस्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. जोडीदाराची साथ अत्यंत मोलाची राहील.

कर्क – (शुभ रंग- आकाशी)

आज मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. जिवलग मित्र आज तुम्हाला योग्यच सल्ले देतील. उत्पन्नाचे विविध मार्ग खुले होतील. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे आहे.

सिंह – ( शुभ रंग जांभळा)

नवीन व्यावसायिक मंडळींना यश दृष्टिक्षेपात येईल. आज कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागू शकते.

कन्या – ( शुभ रंग – लाल )

कामगारांना ओव्हरटाइम करावा लागेल. आज काही देणीही चुकवाल. जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण कमी करणे गरजेचे.

तूळ – ( शुभ रंग- पांढरा)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. कुटुंबियांस पुरेसा वेळ देता येईल. पूर्वी घेतलेल्या अचूक निर्णयामुळे काही लाभ पदरात पडेल.

वृश्चिक – ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांना आज वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. मित्रांना दिलेला शब्द पाळणे कठीण जाईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

धनु – (शुभ रंग- केशरी)

आज शासकीय कामे रखडणार आहेत. नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकला. नोकरीत वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. गृहिणींचा आज देव धर्माकडे ओढा राहील.

मकर – (शुभ रंग-तांबडा)

नवीन झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका. कष्टाची कामे करणार्‍यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आज जोडीदाराच्या चुका काढायची चूक करू नका.

कुंभ – ( शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. घरात आधुनिक सुख सुविधांसाठी हौशीने खर्च कराल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा.

मीन – (शुभ रंग- गुलाबी)

एखाद्या क्षुल्लक घटनेमुळे बेचैन    व्हाल. आज रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. थोडी विश्रांती ही गरजेची आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.