Today’s Horoscope 12 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  शनिवार.  ….. ​दि​.  12 डिसेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार — प्रतिकूल दिवस.
  • आज विशेष – शनिप्रदोष
  • राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – विशाखा.
  • चंद्र राशी – तूळ २२.४१ पर्यंत नंतर वृश्चिक.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- निळा)

आज तुम्हाला काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. तुमचे विचारही प्रगल्भ होतील. नोकरीत आपल्या कामाशी प्रामाणिक रहाल. वैवाहिक जीवनात आज सुसंवाद राहील.

वृषभ – (शुभ रंग – क्रीम)

आज मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमी असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आजच्या  कष्टांचे फळ आज नाही तरी उद्या नक्कीच मिळेल. काही येणी वसूल होतील

मिथुन ( शुभ रंग – गुलाबी)

नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. आज कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य द्यावेसे वाटेल. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

.

कर्क(शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

आज कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून होईल. संध्याकाळी एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल. कलाकारांना रिकाम्या खुर्च्या बघायला लागतील.

सिंह – ( शुभ रंग- लाल)

आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. प्रवासातील ओळखी भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. गृहिणीनी झाकली मूठ झाकलीच ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

कन्या (शुभ रंग- मोतिया)

राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण तुम्हाला अनपेक्षित पैसा मिळवून देईल. तुमची भाग्योदयाकडे वेगाने वाटचाल होईल. आज सहजच काही बोलून जाल ते खरे होईल.

तूळ (शुभ रंग-जांभळा)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळ जास्त होईल. हातचे सोडुन पळत्यामागे धावायचा मोह होईल पण तसे करू नका, महत्वाचे निर्णय विचारांती घ्या.

वृश्चिक (शुभ रंग -राखाडी)

पैसा येण्याइतके चा पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी व विलासी वृत्तीस थोडा लगाम घालणेही गरजेचे आहे. हाती असलेली पुंजी जपून वापरा.

धनु  (शुभ रंग- सोनेरी)

आज आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळीत मोठेपणा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ पदरी पडेल.

मकर –  ( शुभ रंग- केशरी)

नोकरदारांना अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. बिनचूक कामास प्राधान्य द्या. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. कायदा मोडण्याचा विचार स्वप्नातही करू नका.

कुंभ (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल. सत्संगाची साथ सोडू नका.

मीन ( शुभ रंग -चंदेरी)

भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध रहा. वैवाहिक जीवनात आजच्या दिवस मौन ठेवा.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.