Today’s Horoscope 12 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 12 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख 12.01.2024.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा शाढा 15.18 पर्यंत नंतर श्रवण.

चंद्र राशी – मकर.
—————————–
मेष – ( शुभ रंग – तांबडा)
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणे योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. आज घरगुती समस्या वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील.

वृषभ – ( शुभ रंग- निळा)
सहज काही मिळाले नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ चांगले मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. घरात वडीलधाऱ्यांना दुखावू नका.

मिथुन – ( शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेच धाडस करू नका. नाकासमोर चाला.

कर्क – ( शुभ रंग – आकाशी)
कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदाराला अभिमानास्पद वाटण्याजोगी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

सिंह -( शुभ रंग – भगवा)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हीतशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आज तब्येत थोडी नरम असेल.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)
काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

तूळ – ( शुभ रंग- पिस्ता)
कौटुंबिक सदस्यांमध्ये सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगीरी कौतुकास्पद राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक- ( शुभ रंग – पिस्ता)
आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.

धनु – (शुभ रंग- डाळिंबी)
उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून तुमच्या विरोधकांनाही हेवा वाटेल.

मकर – ( शुभ रंग – जांभळा)
जिथे जाल तिथे आज तुम्ही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचे हे विचार ऐकून घ्या. कायदा मोडू नका.
कुंभ – (शुभ रंग- गुलाबी)
हाती असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. वडीलधाऱ्यांशी आज काही किरकोळ मतभेद संभवतात.

मीन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नवीन काही उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रमंडळींकडून उत्तम सहकार्य मिळेल. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा जास्तच असेल.

 

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.