Today’s Horoscope 13 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 November 2023- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 13.11.2023.

शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.

आज विशेष – दर्श अमावस्या.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – विशाखा.

चंद्र राशी – तुळ 21.18 पर्यंत नंतर वृश्चिक.

—————————–

मेष  ( शुभ रंग – क्रीम)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. धंद्यातील निर्णय भागीदारांना विश्वासात घेऊनच घेतलेले बरे.

वृषभ ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणे अंगावर काढू नका पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

मिथुन  ( शुभ रंग- जांभळा)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रश्न चूटकी सरशी सुटतील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. आज उत्साह पूर्ण दिवस.

कर्क  ( शुभ रंग – गुलाबी)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

सिंह ( शुभ रंग – निळा )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करायला हव्यात. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतील. आज घराबाहेर वावरताना रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या  ( शुभ रंग- लाल)

नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. दिवसाच्या पूर्वार्धात काही येणे अनपेक्षितपणे वसूल होतील. आज प्रवासाची दगदग मात्र टाळा.

तूळ ( शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झोपणारी कामे तुम्ही सहजच पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

वृश्चिक ( शुभरंग – लाल)

आज भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज दानधर्म करताना आपली शिल्लक आधी तपासून घ्या.

धनु (शुभ रंग- चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. दुरावलेले मित्रमंडळी जवळ येतील. संध्याकाळी काही आकस्मिक खर्च उद्भवणार आहेत. आज यथाशक्ती दानधर्मही कराल.

मकर (शुभ रंग- मोतिया)

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कामाला लागा. जिवलग मित्र आज योग्य सल्ले देतील.

कुंभ  (शुभ रंग- आकाशी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचा मोह होईल पण तसे आज करू नका. स्वतःवर संयम ठेवणे गरजेचे आहे.

मीन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उदयावरच ढकला. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनशांती मिळेल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.