Today’s Horoscope 18 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार.

18.09.2023.

शुभाशुभ विचार-उत्तम दिवस.

आज विशेष- हरतालिका तृतीया.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – चित्रा 12.08 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – तूळ.

————————————

मेष – ( शुभ रंग- मोरपंखी )

व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक प्रसंगांना यशस्वीपणे तोंड द्याल. पत्नीने दिलेले सल्ले मात्र डावलू नका.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )

नोकरदारांसाठी अनुकूल दिवस असून वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करतील तुमची काही येणी असतील तर ती अनपेक्षित पणे वसूल होण्याची शक्यता आहे.

मिथुन ( शुभ रंग- मरून )

तरुण वर्गाचा आज मौज मजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती उत्तम साथ देईल.

कर्क (शुभ रंग- गुलाबी)

मुलांची आज अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. गृह उद्योग चांगले चालतील. गृहिणींना आज थोडा थकवा जाणवेल नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल.

सिंह (शुभ रंग- हिरवा)

साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. गृहिणी शेजारधर्म जपतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील.

कन्या ( शुभ रंग- पांढरा )

आज तुम्ही कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. व्यवसायात आवक मनासारखी असेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्वीकारावी लागेल. यशदायी दिवस.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी )

आज कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी काही खर्चही कराल. फारच सडेतोड बोलून कोणाच्या भावना मात्र दुखावू नका.

वृश्चिक (शुभ रंग- डाळिंबी)

विदेशाशी संबंधित व्यवसाय उत्तम चालतील. वायफळ खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कार्यालयीन कामासाठी दूरचे प्रवास घडतील. प्रवासात आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

धनु- (शुभ रंग- जांभळा)

व्यावसायिक उलाढाल वाढेल. आप्तस्वकीय व जिवलग मित्र तुमच्या शब्दास मान देतील. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. दिवसाच्या उत्तरार्धात काही लाभ संभवतो.

मकर ( शुभ रंग- मोतिया )

कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. अधिकारी वर्गाला अधिकार वापरावे लागतील. तरुण मंडळींनी आज कुसंगती पासून लांबच राहणे हिताचे राहील.

कुंभ (शुभ रंग – क्रीम )

नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघडच जाईल. उद्योगधंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल दिवस असून नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलून बघतील.

मीन -(शुभ रंग – पिस्ता)

विवाह विषयक बोलणी आज नकोत. जास्त लाभाच्या अशाने कुठलीही असुरक्षित गुंतवणूक करू नका. आज धाडसाची कामे टाळली तर बरे होईल. झटपट लाभाचा मोह तर अजिबात नको.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.