Today’s Horoscope 20 August 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज: आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 August 2022

शनिवार.

20.08.2022

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष — सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 9 ते 10.30

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र — रोहिणी.

चंद्र राशी –  वृषभ.

________________________

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. वक्ते व्यासपीठ गाजवतील. क्षुल्लक करणारे शेजारी रुसून बसतील.

वृषभ- ( शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा, मोफत सल्ले वाटप नको.

मिथुन-( शुभ रंग- मोरपंखी)

आज पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. आज घरातील थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. जमाखर्चाचा मेळ घालणे जरा अवघड जाईल.

कर्क – (शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकाराल. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

सिंह – ( शुभारंभ- डाळिंबी)

वादविवादात आज तुम्ही स्वतःचेच घोडे पुढे दामटवाल. हाताखालच्या मंडळींना तुमचे दडपण जाणवेल. आज आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे.

कन्या- (शुभ रंग- सोनेरी)

क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे थोडेफार नैराश्य जाणवेल. विद्यार्थी आज अभ्यासात चालढकल करणार आहेत.

तूळ (शुभ रंग – चंदेरी)

आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा  विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य द्यावे

वृश्चिक – (शुभ रंग -केशरी)

आज तुम्ही व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील. पारिवारिक सदस्यांमध्ये सलोखा राहील.

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा. काही येणी असतील तर न मागता वसूल होतील.

मकर- (शुभ – रंभ क्रीम)

घरात आधुनिक सुखसोयी साठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. कलाकारांची लोकप्रियता वाढेल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. कार्यक्षेत्रातही स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल.

मीन – ( शुभ रंग- मरून)

दैनंदिन कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून आज सर्व काही सुचेल. टेलिफोन बिल भरावे लागणार आहे. प्रवासात नवी मैत्री होईल. शेजाऱ्यांशी आज गोडी गुलाबी राहील.

 

 

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.