Today’s Horoscope 22 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 September 2022 
गुरुवार.
तारीख 22.09.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष – द्वादशी श्राद्ध.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल- दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
————————————–
मेष – शुभ रंग – राखाडी
धंद्यातील येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. समोरच्या व्यक्तीशी गोड बोलून आपला कार्यभाग साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगली जमेल.

वृषभ- शुभ रंग- गुलाबी
आज तुमचे मन काहीसे अस्थिर असेल. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेणार आहात. जवळपासच्या प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

मिथुन- शुभ रंग- चंदेरी
आवक मनाजोगती असली तरीही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. शुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शब्द जपून वापरा.

कर्क- शुभ रंग- मोरपंखी
आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घेऊ नका. जशास तसे या धोरणाने वागा.

सिंह – शुभ रंग – पांढरा
आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणे चूकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. आज क्षणिक मोहात अडकू नका.

कन्या- शुभ रंग- पिस्ता – Today’s Horoscope 22 September 2022 
जसे चिंताल तसेच होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून काही अपुरी स्वप्न साकार होऊ शकतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

तूळ- शुभ रंग- हिरवा
उद्योग धंद्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदमीने वागतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

वृश्चिक- शुभ रंग- स्ट्रॉबेरी
आज अति आत्मविश्वासही नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्यावे. वाहतुकीचे नियम मोडलेत तर दंड चुकणार नाही.

धनु- शुभ रंग- भगवा
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. आज कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. गाडी चालवताना काळजीपूर्वक चालवा.

मकर- शुभ रंग- पिस्ता
व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

कुंभ- शुभ रंग- मोतीया
आज काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विवाह जुळवणे विषयी बोलणे आज नकोत.

मीन- शुभ रंग- मरून
उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे आज धोरण राहील. व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन कराल.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Nirmala Sitharaman : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य म्हणजे देशाची ऐतिहासिक सेवा – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.